शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर पूर्व मुंबईत युतीला इंजिन धडकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:05 IST

मराठीबहुल असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत मनसेचे इंजिन टिकटिकनुसार सुरू झाल्यामुळे ते युतीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : मराठीबहुल असलेल्या उत्तर पूर्व मुंबईत मनसेचे इंजिन टिकटिकनुसार सुरू झाल्यामुळे ते युतीला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात, मनसेचा प्रभाव जरी कमी झाला असला तरी, आजही काही भागात राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा गट काम करत आहेत. मात्र तो मतांवर किती फरक पाडू शकतो हे निकालावरुनच स्पष्ट होईल.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सोमय्या येथून तीन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यानंतर, माजी आमदार मंगेश सांगळे, राम कदम यांनी कमळ तर, शिशिर शिंदे यांनी धनुष्यबाण उचलले. त्यामुळे फाटाफूट झाली. मात्र, तरी देखील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या भागातील मावळत चाललेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काम सुरु ठेवले. या मतदार संघात सर्वाधिक मराठी मतदार आहे. त्यापैकी बरेच जण आजही बरेचजण मनसेशी एकनिष्ठ आहेत. आघाडीच्या प्रचारात मनसे उतरल्याने, दोन्हीही उमेदवार मतांवर किती फरक पडेन याचा हिशोब लावताना दिसत आहे. अखेरच्या टप्प्यात या भागात राज ठाकरे यांची सभा झाल्यास मतांवर आणखीन फरक पडू शकेन याची शक्यताही नाकारता येत नाही. मनसेचे पदाधिकारी प्रचारा उतरुन मराठी मतदारांना वळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, युतीकडून सर्वोपत्तरी मराठी मत स्वत:कडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.>मनसेने लढवलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?२००९ मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून मनसेच्या शिशिर शिंदे यांनी १.९५ लाख मते घेतली. या मतांच्या फरकामुळे किरीट सोमय्यांचा पराभव होत, राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा विजय झाला.सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतील भांडुपसह विक्रोळी, घाटकोपर पश्चिम मतदार संघ मनसेने काबीज केले. भांडुप, घाटकोपर पश्चिम, विक्रोळीतून मनसेचे ३ आमदार निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये मनसेची पिछेहाट झाली.

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्व