शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 14:59 IST

'ती' फक्त सदिच्छा भेट, मी अपक्षच लढणार; भाजपा प्रवेशाबद्दलच्या चर्चेवर सत्तारांचा खुलासा

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशो चव्हाणांचं पक्षात कोणीही ऐकत नाही. ते इथे शब्द देतात. मात्र दिल्लीतून त्यांचा शब्द फिरवला जातो, असं काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्यानं काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर स्पष्टीकरण देत मी अपक्षच लढणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस माझे जुन मित्र आहेत. राजीनामा देण्यासाठी त्यांची भेट घेतली, अशी माहिती सत्तार यांनी दिली. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षावर सत्तार यांनी भाष्य केलं. पक्षात अशोक चव्हाण यांचं ऐकलं जात नाही. त्यांनी दिलेला शब्द दिल्लीवरुन फिरवला जातो, असं सत्तार म्हणाले. सत्तार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली खदखद महत्त्वाची मानले जात आहे. औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तुम्हाला कशी मदत करणार, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर खैरे यांना पराभूत करणं हेच लक्ष्य आहे. मात्र त्यासाठी मदत करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणी झालेली नाही, असं सत्तार यांनी सांगितलं. आपण अपक्ष म्हणून लढणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेसवर नाराज झालेले अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं खुलासा सत्तार यांनी केला. मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही गेल्या साडे चार वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी मदत केली. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला, असं सत्तार म्हणाले. विशेष म्हणजे सत्तार यांनी तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचादेखील राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केलं. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAbdul Sattarअब्दुल सत्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस