शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; मंत्र्यांची आज पहिली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 05:46 IST

भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल. 

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : नितीशकुमार यांनी दोन दशकात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा मान पटकावला आहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या १४ सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह रालोआचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीने मात्र शपथविधीवर बहिष्कार घातला.राज्यपाल फगू चौहान यांनी नितीशकुमार यांच्यासह नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

नितीशकुमार यांनी सर्वानुमते रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर रविवारी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. ६९वर्षीय नितीशकुमार हे २००५ पासून कायम मुख्यमंत्री राहिले आहेत. अपवाद केवळ २०१४-१५ सालचा. त्यावेळी जतीनराम मांझी यांच्याकडे काही काळ मुख्यमंत्रिपद होते. यापूर्वी श्रीकृष्ण सिंग हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले होते. त्यांचा विक्रम मोडण्याचा मान नितीशकुमार यांच्याकडे राहील.

भाजपच्या वाट्याला  सात मंत्रिपदे....भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल. हे दोघेही व्यासपीठावर नितीशकुमार यांच्या बाजूला बसले होते. जेडीयूच्या पाच मंत्र्यासह हिंदुस्थानी अवामी मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) प्रत्येकी एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. बिजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, विजयकुमार चौधरी या जुन्या सहकाऱ्यांसह मेवालाल चौधरी आणि शीलाकुमारी मंडल हे जदयूचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  

रालोआचे कुटुंब प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल- मोदीरालोआचे कुटुंब बिहारच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे अभिनंदन करताना दिली आहे. बिहारच्या कल्याणासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी नितीशकुमार यांना पाठविलेल्या ट्वीटमध्ये दिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारजी यांचे अभिनंदन. बिहार सरकारमधील सर्व मंत्र्यांचे अभिनंदन. बिहारच्या विकासासाठी रालोआचे कुटुंब एकजुटीने कार्य करेल, असे मोदींनी म्हटले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा