शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena-Bjp Clash: सेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा नितेश राणेंनी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 23:29 IST

Shiv Sena-Bjp Clash: भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे.

मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठीच्या जमीन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून बुधवारी शिवसेना भवन परिसरात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे. (nitesh rane felicitates bjp yuva morcha workers over marching on shiv sena bhavan)

राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्यांनी या व्यवहाराच्या चौकशीची भूमिका घेतली. त्या भूमिकेविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनसमोर फटकार मोर्चा काढला. काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेली शिवसेना हिंदुत्व विसरली, धर्मनिरपेक्ष बनलेली शिवसेना आता खोटे आरोप करत हिंदुत्वाच्या आस्थेवरही आघात करत असल्याचा आरोप भाजपने केले.  यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केल्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. 

आज शूर मावळ्यांचा सत्कार केला!! 

राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत नितेश राणे यांनी ट्विटवर काही फोटो शेअर केले आहेत. याला आज शूर मावळ्यांचा सत्कार केला, असे ट्विट केले आहे. यावेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित ४० कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

“कोरोनाची तिसरी लाट अधिक दूर नाही”; हायकोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

दरम्यान, जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असे ट्विट नितेश राणे यांनी करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.  

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईNitesh Raneनीतेश राणे