शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:29 IST

Nilesh Rane on Shivsena: 'संजय राऊत धमकी द्यायला लागले, तुम्ही फटाके खाणारच आहात'

ठळक मुद्दे'शिवसेनेचे संपादक धमक्या देत आहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत'

मुंबई:शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे शिवसेना आणि आदेश बांदेकर यांच्यावर निशाणा साधलाय. 'आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाहीत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो, की होम मिनिस्टर म्हणतो, हेच कळत नाही,'असे राणे म्हणाले.

निलेश राणे यांनी आज ट्विटरवर पोस्ट करुन शिवसेनेवर निशाणा साधला. 'शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघा. मोबाईलची बटणं दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात,' अशा शब्दात त्यांनी सेनेवर टीका केली.

संजय राऊत फटके खाणारच...त्याआधीही निलेश राणे यांनी एक ट्विट करत संजय राऊत आणि सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला होता. 'हे काय ऐकतोय मी, की संजय राऊत धमकी द्यायला लागले, संजय राऊत तुम्ही फटाके खाणारच आहात, पण खास तुमच्यासाठी, तुम्हाला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देत आहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,' अशी टीका निलेश राणेंनी केली.

काय म्हणाल होते संजय राऊत ?वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं विधान करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेनं अनुल्लेखानं मारलं आहे. यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. लाड यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी सारवासारव सुरू केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं म्हणत लाड यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNilesh Raneनिलेश राणे Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा