शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचा; संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 07:30 IST

Sanjay raut in nashik: शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना निधी मिळण्यात विलंब होण्यासह कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी रविवारी खा. संजय राऊत यांच्याकडे केल्या. त्यावर त्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्येच उत्तर द्या, असे सांगून पुढील पालकमंत्री शिवसेनेचाच होईल, यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी दिले.

  शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या वेळी राऊत यांनी शिवसेनेकडे सत्ता नसतानाही आपण अनेकांना आपल्या स्टाइलने उत्तरे दिली आहेत. त्याप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर द्या, तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.

पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्रीराज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले  असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केेले. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असून त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची टीकाही त्यांनी केली. पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNashikनाशिक