शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

Sachin Vaze: सचिन वाझे-मनसुख हिरेन प्रकरणात नवा गौप्यस्फोट?; देवेंद्र फडणवीस दिल्लीत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:55 IST

BJP Devendra Fadnavis Press Conference in Delhi, May be on Mansukh Hiren Death or Sachin Vaze Case: या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला, सचिन वाझेंना पुन्हा निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले.

ठळक मुद्देराज्यात एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका तर दिल्लीत भाजपाची रणनीती भाजपा मुख्यालयात देवेंद्र फडणवीस घेणार पत्रकार परिषदसचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर नवीन दावा करणार?

नवी दिल्ली – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी,(Mukesh Ambani Bomb Scare) स्कोर्पिओ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू(Mansukh Hiren Death) आणि सचिन वाझे यांना अटक(Sachin Vaze Arrested by NIA) या प्रकरणाचे एकमेकांशी धागेदोरे जोडलेले आहेत. सचिन वाझे प्रकरणात खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाकरे सरकारविरोधात गंभीर आरोप केले होते, इतकचं नाही तर सचिन वाझे यांच्याभोवती अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, वाझेंविरोधात देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यानिशी थेट आरोप केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं.

सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश

सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामी(Arnab Goswami) यांच्याविरोधात कारवाई केली त्याचा राग भाजपाच्या मनात आहे म्हणून त्यांच्याकडून वाझेंवर आरोप करण्यात येत असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत होतं, परंतु या प्रकरणाचा तपास NIA कडे जाताच सचिन वाझेंबद्दल विविध धक्कादायक माहिती समोर आली, यानंतर NIA ने सचिन वाझेंना अटक केली, या संपूर्ण प्रकारामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला, सचिन वाझेंना पुन्हा निलंबित करण्याचे आदेश सरकारने दिले. त्यामुळे वाझे प्रकरणावरून सरकारची कोंडी झाली आहे.

अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आज दिल्लीत असून ५.३० च्या सुमारास ते पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे आता मनसुख हिरेन किंवा सचिन वाझेंबद्दल कोणता नवा गौप्यस्फोट फडणवीस करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

CCTV मध्ये दिसणारी तीव्यक्ती सचिन वाझेच

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जे सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं, त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु NIA च्या तपासात ही व्यक्ती पीपीई किट्स नव्हे तर पांढऱ्या रंगाचा मोठा कुर्ता आणि डोक्यावर रुमाल घेतल्याचं समोर आलं आणि ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून सचिन वाझेच असल्याचा खुलासा NIA ने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे. NIA ने म्हटलंय की, CCTV फुटेजमध्ये सचिन वाझे मोठ्या रुमालाने स्वत:चं डोकं लपवत जाताना दिसतात, कारण त्यांना कोणी ओळखू नये, त्याचसोबत बॉडी लॅग्वेंज आणि चेहरा लपवण्यासाठी त्यांनी मोठ्या आकाराचा कुर्ता-पायजमा घातला होता, पीपीई किट्स नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच सचिन वाझे यांच्या कार्यालयात NIA ने छापा टाकला होता, त्यात लॅपटॉप जप्त केला, त्यातील डेटा आधीच डीलिट करण्यात आला होता

“सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”

सचिन वाझेंकडे जेव्हा फोनची विचारणा केली तेव्हा मोबाईल कुठेतरी गडबडीत ठेवल्याचं वाझे म्हणाले, परंतु खऱ्या अर्थानं जाणूनबुजून सचिन वाझेंनी त्यांचा फोन फेकून दिला असल्याचं NIA ने म्हटलं आहे.

'ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो'

दरम्यान, एनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो आणि इनोव्हा गोडी जप्त केल्यानंतर NIA ने मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीही जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते. जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा  वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी  करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा