शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 20:50 IST

मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा भाजपनं संधी नाकारली

पाटणा: संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सलग चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये सुशील कुमार मोदी यांचा समावेश नाही. त्यामुळे नाराज झालेले सुशील मोदी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेपासून दूर राहिले. मागील सरकारमध्ये मोदी यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद होतं. मात्र यंदा पक्षानं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही.मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठनितीश कुमार यांनी शपथविधीनंतर सुशील कुमार मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मात्र याबद्दलचे प्रश्न तुम्ही भाजप नेत्यांना विचारा, असं उत्तर त्यांनी दिलं. 'जनमताचा कौल मिळाल्यानं राज्यात एनडीएनं सरकार स्थापन केलं आहे. सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का देण्यात आलं नाही, याबद्दलचे प्रश्न तुम्ही त्यांना (भाजपला) विचारा. कारण हा निर्णय त्यांनी घेतला आहे,' असं कुमार म्हणाले. आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही सोबत काम करतो आणि यापुढेही करत राहू, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधानबिहार निवडणुकीचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनादेखील सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का नाकारण्यात आलं, याबद्दलचे प्रश्न विचारण्यात आले. 'सुशील मोदी अजिबात नाराज नाहीत. ते पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल. त्यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाईल,' असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं सुशील मोदी नाराज नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज पाटण्यात होते. मात्र त्यांच्या स्वागतासाठी सुशील मोदी गेले नाहीत. मोदींनी त्यांच्या या कृतीतून पक्ष नेतृत्त्वाकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांनी सांगितलं. काल दिवसभर सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि बैठका सुरू होत्या. त्यातही मोदींचा सहभाग नव्हता.जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरीसुशील मोदींनी जवळपास १३ वर्षे नितीश कुमार यांच्यासोबत काम केलं आहे. मागील सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यामुळे आताही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षानं त्यांना संधी दिलेली नाही. त्यामुळे मोदी नाराज आहे. कार्यकर्ता हे पद म्हणजे माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत, असं मोदींनी कालच म्हटलं होतं. त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपनं उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. तारकिशोर प्रसाद, रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे.

भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्षभाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं होतं.

नितीश कुमार यांची कसोटी लागणारनितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व असलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाAmit Shahअमित शहा