मुंबई - राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीने अनेक गौप्यस्फोट होत आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राजकीय उलथापालथ होऊन देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद गेले तर इतक्या वर्षाच्या मित्रपक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ दिली, मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात संघर्ष झाला, हा संघर्ष इतका टोकाला गेला की दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री विराजमान केला.
द इनसाइडरला मुलाखत देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी योगी नाही, माणूस आहे, आनंदही होतं, दुःखही होतं. २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री बनेन याची कल्पना नव्हती पण तसे संकेत मिळाले होते. पण या कानालाही कळू द्यायचं नाही, त्याप्रमाणे कधी बोललो नाही. आई, पत्नीलाही सांगितलं नव्हतं. पण २०१९ मध्ये माझ्यासह सगळ्यांना माहीत होतं मी मुख्यमंत्री बनणार पण तेव्हा मी झालो नाही, दुःख नक्कीच झालं, काही दिवस मला विश्वास बसला नाही, हे अचानक असं का घडलं? त्यानंतर कालांतराने ते स्वीकारलं, शिवसेनेचा राग निश्चितच आला होता. सरकार हातातून निसटतंय. सगळ्या गोष्टी आपल्य बाजूने असताना, हे सरकार गेलं कसं, यावर विश्वास बसत नव्हता त्यानंतर १०-१२ दिवसांत नॉर्मल झालो. एक्स्ट्रिम दुःख किंवा आनंद होतं नाही. नंतर जो रोल मिळाला त्यात घुसलो आणि काम सुरू केलं असं त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...
तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी युती म्हणून मी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलो होतो, विधानसभा निवडणुकीवेळी अनेक भाजपाच्या बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, पण शिवसेनेची बंडखोरी भाजपा उमेदवारासमोर कायम राहिली. उद्धव ठाकरे भाजपा उमेदवाराच्या प्रचाराला कधी गेले नाहीत, पण मी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात गेलो होतो. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं. तुमचं माझं पटत नाही तर तुम्ही तसं फोनवरुन स्पष्ट सांगितलं पाहिजे, व्यक्तिगत संबंधांना तडा नाही पण मनात नेहमी हे दु:ख राहणार आहे, त्यांची आणि माझी चर्चा झाली असती तर आता ज्याप्रकारे सरकार चालवतायेत तसं ते चालवावं लागलं नसतं, बाळासाहेब ठाकरेंना वचन देताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवणार असं सांगितले होते का? बाळासाहेबांनी हे कधीच मान्य केले नसते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.
त्याचसोबत दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपा सोबत येण्याची स्थिती आली होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला एकटं पाडा, पण शिवसेनेला सोडू नका इतकं स्पष्टपणे सांगितले होते. पंतप्रधानांचा निरोप अमित शहांनी थेट शरद पवारांना सांगितला होता. भाजपासोबत यायला राष्ट्रवादी पूर्णपणे तयार होती, शिवसेनेने आता काय मिळवलं माहिती नाही. भलेही ते बाळासाहेबांचे सुपूत्र असतील त्यांचा अधिकार आहे, पण मी ज्या बाळासाहेबांना ओळखतो त्यांनी कधीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास मान्यता दिली नसती असं देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाने सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
"'मातोश्री'विरुद्धच्या बंडासाठी 'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती सगळ्यांना माहीत आहे!"
बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा
संभाव्य कोरोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू; तब्बल २० तास मृतदेह घराबाहेरच पडून राहिला, त्यानंतर...
...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!