शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Big Breaking... विजयसिंह मोहिते-पाटील भाजपात, रणजितसिंह माढ्यातून लोकसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 13:59 IST

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

- राजा माने, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात आज दुपारी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत विजयसिंह मोहिते-पाटीलभाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घ्यावा लागला, यावर बोलणार आहेत. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं मोहिते-पाटील भाजपात जाणार आहेत. विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह माढ्यातून लोकसभा लढवणार आहेत. मुंबईत उद्या त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला बांधण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते-पाटील यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पुत्र रणजीतसिंह यांना भाजपानं माढ्यातून उमेदवारी देऊ केली आहे. उद्या मोहिते-पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी नेत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलावून घेतले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस