शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; अजित पवारांनी अंग काढून घेतल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 06:14 IST

नवी मुंबईच्या निवडणुकीवर डोळा, की राजकीय पुनर्वसनाला प्राधान्य?  ठाण्यातून नजीब मुल्ला, कर्जतचे आमदार सुरेश लाड अशी वेगवेगळी नावे सध्या चर्चेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई/उरण : आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ म्हणून ओळखल्या जाणारे सिडको महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येईल असे गृहीत धरून त्यासाठी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. 

ठाण्यातून नजीब मुल्ला, कर्जतचे आमदार सुरेश लाड अशी वेगवेगळी नावे सध्या चर्चेत आहेत. यापूर्वी हे महामंडळ सांभाळलेल्या प्रमोद हिंदुराव यांना पुन्हा संधी हवी आहे. इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडीतून अंग काढून घेतल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार नेमकी कोणाची निवड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राजकीय पुनर्वसन की नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वरचष्मा असलेल्या नेत्याची निवड यातील कशाला प्राधान्य दिले जाते, ते लवकरच स्पष्ट होईल.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाआघाडी सरकार अस्तित्वात आले तेव्हाच तिन्ही पक्षांत महामंडळाचे वाटप झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यावरील नियुक्त्या लवकर केल्या जाव्या यासाठी नुकतीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच नियुक्त्या होतील असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे.   त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एखाद्याला संधी दिली जाते,की पुण्यातून कोणाला संधी दिली जाते यावरही पक्षात चर्चा झडत आहेत.

भाई जगताप यांचे काँग्रेसकडून नाव?आम्ही नेहमी दुय्यम भूमिकेत का रहायचे, म्हाडा किंवा सिडको आमच्या वाट्याला का नको, अशी भूमिका घेत काँग्रेसच्या काही नेत्यांनी सिडकोचे अध्यक्षपद आपल्या पक्षाला मिळावे अशी मागणी केली होती. त्यासाठी भाई जगताप यांचे नावही पुढे केले होते. मात्र जगताप यांच्याकडे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद असल्याने आणि त्या निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याने पक्षातून त्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आले नाहीत. तसेच तिन्ही पक्षांच्या वाटणीत हे महामंडळ नेमके कोणाला दिले जाईल यावरही पक्षनेत्यांनी काहीही सांगितलेले नाही. 

टॅग्स :cidcoसिडकोAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार