शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज", नवाब मलिकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 16:07 IST

Nawab Malik : एखादा विषय प्रलंबित ठेवणे किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देआज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला देशातील 12 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वतीने एका पत्रकावर स्वाक्षरी करत समर्थन दिले आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्यामुळे शेतकरी संघटनांनी या नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचे आवाहन केले असून आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितले आहे. (NCP leader Nawab Malik criticizes PM Narendra Modi over farmers agitation)  

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्र सरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा विषय प्रलंबित ठेवणे किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.  

आज केंद्राच्या तीन जाचक कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण आहेत. आज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकांनी काळी फित लावून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवावा असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. याचबरोबर केंद्र सरकारने जे कृषी कायदे केले आहेत. त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शेतकरी या कायद्यांविरोधात 6 महिने आंदोलन करत आहेत. त्यामुळे केंद्राला शेतकरी विरोधात आहेत, हे कळले पाहिजे आणि केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पाहिजेत, असे नबाव मलिक यांनी म्हटले आहे.

'केंद्राने राष्ट्रीय धोरण तयार करून लसींची जबाबदारी स्वीकारावी' नवाब मलिक यांनी कोरोना लसीकरणावरूनही केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षावरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. मात्र लस मिळत नाही. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो, त्याबद्दल सांगावे, असे नवाब मलिक म्हणाले. याशिवाय, देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्‍याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाचं एक धोरण ठरवावे आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आता तरी केंद्राने एक राष्ट्रीय धोरण तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

(आनंद महिंद्रांकडून जपानला 'मुंबई मॉडेल' अवलंबण्याचा सल्ला; युजर्स म्हणाले...)

देशातीत 12 प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबाआज शेतकरी काळा दिवस साजरा करत आहेत. या आंदोलनाला देशातील 12 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वतीने एका पत्रकावर स्वाक्षरी करत समर्थन दिले आहे.  यामध्ये सोनिया गांधी (काँग्रेस), एचडी. देवेगौडा (जेडीएस), शरद पवार (राष्ट्रवादी), ममता बॅनर्जी (तृणमूल), उद्धव ठाकरे (शिवसेना), एमके स्टालिन (डीएमके), हेमंत सोरेन (जेएमएम), फारुक अब्दुल्ला (जेकेपीए), अखिलेश यादव (आरजेडी), डी. राजा (सीपीआय), सिताराम येचुरी (सीपीआय- एम) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन