शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पंतप्रधान 'मन की बात' किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 16:01 IST

Supriya Sule : काहींच्यासाठीच मोदींचे अश्रू निघतात, शेतकऱ्यांसाठी नाही, सुप्रिया सुळे यांची टीका

ठळक मुद्दे काहींच्यासाठीच मोदींचे अश्रू निघतात, शेतकऱ्यांसाठी नाही, सुप्रिया सुळे यांची टीकाफोन केल्यानंतप पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही, सुळे यांचा आरोप

'मन की बात' मधून एक फोन करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी हे 'मन की बात' मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. पण कृती काहीच करत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. "काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात. परंतु माझ्या आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत. यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते," असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला."कोरोनाच्या काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का?," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. अंबरनाथमधील भागातील रस्त्यांची अवस्था चांगलीअंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे कारण हे रस्ते आमचे सरकार असताना झाले आहेत. याअगोदर या देशात काहीच झालं नाही की कसली उभारणी झाली नाही, जी सहा वर्षांत झाली असे केंद्र सरकार सांगत आहे. अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या. परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.ईडीच्या नोटीसनंतर गेम चेंजशरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिली असल्याचं म्हणत साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रambernathअंबरनाथFarmerशेतकरी