शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 13:11 IST

Sharad Pawar taunts Chandrakant Patil: पूजा चव्हाण आतहत्या प्रकरणावर बोलणं शरद पवारांनी टाळलं; चंद्रकांत पाटील यांना टोला

पुणे: पूजा चव्हाण नावाच्या तरुणीनं केलेल्या आत्महत्येमुळे शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केलं आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गप्प का, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यानंतर आता पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar taunts Chandrakant Patil)"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"ज्यांना आपलं स्वतःचं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेल्या विधानावरही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात सुरू असलेल्या 'खयाल यज्ञ' संगीत महोत्सवालक त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!" राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी  शनिवारी केलेलं विधान अत्यंत धक्कादायक आहे. हे विधान म्हणजे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना याचाही विचार व्हावा. परंतु, या विधानामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता निर्माण होणार याबद्दल आपल्या मनात शंका नसल्याचेही ते म्हणाले. देशातील न्यायव्यवस्था किती उच्च आहे, असं गेल्याच आठवड्यात न्यायाधीशांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.पुण्यात खयाल यज्ञ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आज शरद पवार उपस्थित होते. पवारांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे खासदार श्रनिवास पाटील, भाजपचे खासदार गिरीश बापट हजर होते. तीन दिवसीय खयाल यज्ञ कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित राहुल देशपांडे, देवकी पंडित, मंजुषा पाटील, पंडित राजन साजन मिश्रा आज त्यांची कला सादर करणार आहेत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारPooja Chavanपूजा चव्हाण