शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:45 IST

देशासाठी मतदान करण्याचे आवाहन; मोदींनी लष्कराला निर्णय स्वातंत्र्य दिल्याचा दावा

मुंबई : देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते, याची जाणीव नरेंद्र मोदींनी करून दिली आहे. उरी व पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोदींनी धडा शिकवला आहे. असे असताना काँग्रेस मात्र जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक केवळ विकासाची नसून, विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षिततेची आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देशासाठी मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर मध्य मतदारसंघातील भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथील शिवाजी मैदानामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर व राहुल गांधींवर सडकून टीका केली. २००८चा दहशतवादी हल्ला असो की पाकची इतर आगळीक, तत्कालीन पंतप्रधान कणखर नसल्याने योग्य प्रत्युत्तर देण्यात आले नाही. मोदींनी मात्र लष्कराला निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले व पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. मुंबईत सध्या प्रति माणसी सव्वा लाख रुपये विविध प्रकल्प उभारणीवर खर्च होत आहेत. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या पाव पटदेखील खर्च केला नाही. मुंबईत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना धक्के खावे लागणार नाहीत. मुंबईचे चित्र बदलण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला.मुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्यात येणार असून मेट्रो, रेल्वे, मोनो, बस व जलप्रवास एकाच तिकिटावर करता येईल असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना आचारसंहितेनंतर व पावसाळ्यापूर्वी नवीन घराच्या चाव्या देण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, लीलाधर डाके, आमदार आशिष शेलार, मंगेश कुडाळकर, पराग आळवणी, संजय पोतनीस, आर. एन. सिंह, सुधाकर देशमुख, तृप्ती सावंत, अविनाश महातेकर उपस्थित होते.‘काँग्रेसचा जाहीरनामा, उधारीचा मामला’काँग्रेसला पराभवाची खात्री वाटत असल्याने ते काहीही आश्वासन देत आहेत. राहुल गांधींच्या पणजोबा, आजी, वडील व आईला सत्तेची संधी दिली; मात्र जनतेची गरिबी हटली नाही. केवळ त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गरिबी हटल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस नेत्यांना झोपेतदेखील मोदी दिसतात. त्यांचे जाहीरनामे, भाषणे सर्व उधारीचा मामला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.‘वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर विकासकामांची तलवार’पूनम महाजन म्हणाल्या, वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर मी विकासकामांची तलवार घेऊन लढाई लढत आहे. माजी खासदाराचा १० वर्षांतील विकासाचा अनुशेष भरून काढल्याचा दावा महाजन यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक