शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Nashik Oxygen Leak: दुर्घटनेचे राजकारण! नाशिक महापालिकेत सत्ता भाजपची, निशाणा राज्य सरकारवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 05:50 IST

महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेच्या येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेतही विरोधकांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे महापालिकेचे असून, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.

महापालिकेने जुन्या नाशकातील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवले आहे. १५० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात बुधवारी सकाळी क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १५७ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. एकूण रुग्णांपैकी ६३ रुग्ण हे अतिगंभीर होते. दुपारच्या सुमारास येथील ऑक्सिजन टाकीला गळती लागली आणि एकच धांदल उडाली. त्याची तांत्रिक दुरुस्ती होईपर्यंत ऑक्सिजनवर असलेल्या २२ जणांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

सदर रुग्णालयात महापालिकेने १५ ते २० दिवसांपूर्वीच ऑक्सिजनची टाकी बसवली होती. ठेकेदारामार्फत या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे सारे संचालन महापालिकेमार्फत चालते, असे असताना या दुर्घटनेनंतर भाजप नेते राज्य सरकारवर तुटून पडले. रुग्णांच्या कुटुंबीयांचा आक्रोश !

नाशिक : कुणाची आई, कुणाचे दाजी, कुणाची बहीण, कुणाची आजी, कुणाचे वडील तर कुणी सख्खा भाऊ गमावल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. कुणी डॉक्टरांना, कुणी प्रशासनाला, कुणी शासनाला दोष देत होते. तर कुणी फोनवर कुटुंबीयांशी बोलत त्यांची हतबलता व्यक्त करीत होते. रुग्णालयाबाहेर येणारा प्रत्येक नातेवाईक ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो फोडत होता. कुणी तळतळाट व्यक्त करीत होते, तर कुणी आपलीच छाती बडवून घेत होते. अशा शोकसंतप्त नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना.दहा दिवसांपासून माझे दाजी ॲडमिट होते. मी दहा दिवसांपासून घरी न जाता इथेच रुग्णालयाबाहेर थांबून होतो. आता दोन-तीन दिवसांत त्यांना घरी नेणार होतो. आता बहिणीला काय सांगू, तेच कळत नाही. - अविनाश बिऱ्हाडे (मृत सुनील झाल्टे यांचा मेव्हणा)आमचे व्याही हे मागील आठवड्यापासून उपचार घेत होते. इथे ऑक्सिजनची दुर्घटना घडल्याचे समजल्याने  तत्काळ आलाे. मात्र, ते वाचू शकले नाहीत. - शांताराम पाटील (मृत श्रावण पाटील यांचे व्याही) 

ऊठसूट ठाकरे सरकारवर बरसणाऱ्या भाजप नेत्यांना महापालिकेत त्यांचीच सत्ता असल्याचा विसर पडल्याचे दिसते. महापालिकेत ठेकेदार व भाजप या एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत. ठेकेदार पाहून काम दिले जाते. ही दुर्घटना म्हणजे पालिकेतील व्यवस्थेचे बळी आहेत. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, नाशिक मनपा

टॅग्स :Nashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका