शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Patil: माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पक्ष सोडताना केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 17:18 IST

Narendra Patil leaves Shiv Sena : एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे आज एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला (Shiv Sena) जबरदस्त धक्का बसला आहे.

मुंबई - एकीकडे विविध घटनांवरून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे आज एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला (Shiv Sena) जबरदस्त धक्का बसला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. (Mathadi Labor leader Narendra Patil leaves Shiv Sena, made serious allegations against Shiv Sena leader)

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून फारकत घेण्याची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा दावाही नरेंद्र पाटील यांनी केला.  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले.   नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र