शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचं भाजपाला समर्थन; पण नितेश म्हणतात, सरकारविरोधात मतदान करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 21:12 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सध्या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत.

मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सध्या भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. भाजपानं त्यांना जाहीरनामा समितीतही स्थान दिलं. परंतु त्यानंतर सेना-भाजपाची युती झाली आणि राणेंनी बंडाचा झेंडा फडकावला, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी पुत्र निलेश राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विशेष म्हणजे तिथून सेना-भाजपा युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे पंतप्रधान मोदींना समर्थन देण्याची भाषा करत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी मात्र मतपेटीतून सरकारला त्यांची जागा दाखवून द्या, असं मराठा समाजाला आवाहन केलं आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुभाष पाटील हे माजी शिवसैनिक आणि मराठवाडा विकास सेनेचे नेते आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आलेल्या नितेश राणेंनी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या युवकांना गृह खात्याने पुन्हा नोटिसा बजावल्या आहेत, त्याचा रोष नितेश राणे यांनी व्यक्त केला. मराठा समाजातील तरुणांना गुन्हेगार असल्याचं सांगत सरकारचा बदनामी करण्याचा कट असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. तसेच आता समाजाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.58 मोर्चे काढून यांना आपली ताकद दिसली नाही. आता जिथे जिथे हे उभे आहेत त्या ठिकाणी विरोधात मतदान करा, आमच्या विरोधात गेलात तर घरी बसावं लागेल हे दाखवून द्या, आता मराठा समाजाने भूमिका घेतली पाहिजे, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. सरकारला त्यांची जागा मतपेटीच्या माध्यमातून दाखवा, असंही नितेश राणे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे मोदींना पाठिंबा देण्याची भाषा करत असताना त्यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार नितेश राणे मात्र त्याच मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान करताना दिसून येत असल्याने राणे कुटुंबात नेमकं चाललं काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग