शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तासाभराच्या बैठकीत अर्धा तास राणेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं; सरकारी बाबूंची भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:50 IST

पहिल्याच दिवशी नारायण राणेंचा आक्रमक अवतार; अधिकाऱ्यांची शाळा घेतली

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. राष्ट्रपती भवनात ४३ जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यानंतर आज नवनियुक्त मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला. लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळालेल्या नारायण राणेंनी पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे सरकारी बाबूंची भंबेरी उडाली.महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी?; मोदींनी शहांवर सोपवली नवी जबाबदारी

आक्रमक स्वभाळामुळे कायम चर्चेत असलेल्या नारायण राणेंनी आज मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. जबाबदारी स्वीकारल्यानंतर राणे कामाला लागले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र अधिकारी बैठकीला तयारी करून आले नव्हते. त्यामुळे राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्यामुळे अधिकाऱ्यांची दैना झाली.पियूष गोयल, स्मृती इराणींना दे धक्का; आणखी एक महत्त्वाचं खातं गुजराती व्यक्तीकडे

मंत्रालयात किती अधिकारी अनुपस्थित आहेत याची माहिती राणेंनी मागवली. 'मी मंत्रालयात पदभार स्वीकारायला येणार असल्याची कल्पना असतानाही तयारी का केली नाही?' असा सवाल करत राणेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. जवळपास १ तास चाललेल्या बैठकीत राणेंनी अर्धा तास अधिकाऱ्यांची शाळा घेतली. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.

नारायण राणेंना लघू, मध्यम उद्योग खातं दिलं. पण त्यांची उंची अजून मोठी आहे, असा खोचक टोला लगावणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊत यांना राणेंनी प्रत्युत्तर दिलं. 'कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि खात्याला न्याय देईन, तेव्हा हे खातं किती महत्त्वाचं आहे ते राऊतांना कळेल,' असा प्रतिहल्ला राणेंनी केला.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊत