शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

Narayan Rane: राणे कुटुंबिय कोकणात होते, मग वरुण सरदेसाईंनी आव्हान कोणाला दिले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:08 IST

Varun Sardesai: वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वासाठी युवासेनेचा आक्रमक पवित्रा. राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यांनी रस्त्यावर ठाण मांडून थेट राणे परिवाराला आव्हान दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेने मंगळवारी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. राणे विरोधातील आंदोलनात युवासेना आघाडीवर होती. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट राणे यांच्या जुहू येथील घरासमोर राडा केला. त्यामुळे या आंदोलनातून सरदेसाई यांचे नेतृत्व पक्के करण्याची राजकीय खेळी झाल्याची चर्चा आहे.

Narayan Rane: राणेंच्या अटकेसाठी परब यांचा दबाव! राज्यभरात काेंबड्या उडवून सेनेचा राणेंवर प्रहार

राणे यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेना व राणे समर्थक एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. स्वतः युवा सेना सचिव सरदेसाई भिडल्याची क्लिप व्हायरल झाली. सरदेसाई यांनी रस्त्यावर ठाण मांडून थेट राणे परिवाराला आव्हान दिले. या साऱ्या घटनांचे व्हिडीओ तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. सरदेसाई एकटेच अख्ख्या राणे कुटुंबाला भिडल्याचे चित्र यानिमित्ताने तयार झाले. ‘दगड, लाठ्या, बंदुका, काहीपण आणा, उद्धव साहेबांविषयी चुकीचे बोलणाऱ्यांसाठी आमचे हातच काफी आहेत’ या सरदेसाई यांच्या विधानाचे फोटो सोशल मीडियात फाॅरवर्ड केले गेले.

Narayan Rane: ...अन् असे घडले अटकनाट्य! भाजपची खेळी फसली; राणे ट्रॅपमध्ये सापडले

मंगळवारी सकाळपासूनच सरदेसाई यांच्या नावाने सेना समर्थकांना मेसेज पाठविले जात होते. ‘प्रत्येक युवासैनिक आज दिसला पाहिजे! मुंबई आमच्या साहेबांची हे दाखवायची आज वेळ आहे’ असे मेसेज फिरविण्यात आले. त्यामुळे या सर्व आंदोलनातून युवासेनेत सरदेसाई यांचे नेतृत्व पक्के झाल्याची चर्चा आहे.  विविध प्रकरणांत सरदेसाई आणि सहकाऱ्यांवर होत असलेली टीका शिवसेनेला अडचणीत आणणारी असल्याचे पक्षातील जुने नेते बोलून दाखवत होते. ही नकारात्मक चर्चा टाळण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने मध्यंतरी सबुरीची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात युवासेना सचिव म्हणून सरदेसाई यांचे राज्यभर सभा, कार्यक्रम घेतले. कोरोना काळातही जिल्ह्याजिल्ह्यात सभा यशस्वी होतील, याची काळजी घेण्याच्या सूचना होत्या. त्यातच आता राणे यांच्याविरोधातील आंदोलनात सरदेसाई यांचा चेहरा पुढे आल्याने सरदेसाई यांची युवासेनेवरील पकड पक्की झाली आहे.

Narayan Rane: केंद्रीय मंत्र्याला अटक होऊ शकते? देशभरातील मंत्र्यांमध्ये नारायण राणे तिसरे

आव्हान दिले, पण राणे कुठे होते?राणे कुटुंबाला घरात घुसून आव्हान देणाऱ्या वरुण सरदेसाई यांना शिवसेनेच्या सोशल मीडियाने डोक्यावर घेतले आहे. पण, राणे कुटुंबीय जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणात होते. जुहूच्या घरी कोणीच नव्हते. मग, अशा वेळी रस्त्यावर बसून कोणत्या राणेंना खाली उतरण्याचे आव्हान दिले गेले, हे शोधावे लागेल, अशी तिरकस टिप्पणी शिवसेनेतील एका जुन्या नेत्याने केली आहे.

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे