शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: "मुख्यमंत्री, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी टोकाचे प्रयत्न करूनही…’’ निलेश राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:58 IST

Nilesh Rane again Criticize Shiv Sena: नारायण राणेंची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आत राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. 

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर काल पोलिसांना नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, काल रात्रीच राणेंना जामीन मिळाला असला तरी या निमित्ताने शिवसेना आणि राणेंमध्ये निर्माण झालेला वाद पुढचे काही दिवस धुमसत राहण्याची शक्यता आहे. नारायण राणेंच्या अटकेच्या निमित्ताने शिवसैनिक आणि भाजपामधील राणे समर्थकांमध्ये काल जोरदार राडा झाला होता. दरम्यान, नारायण राणेंची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आत राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, काल संपूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली होती. पण महाराष्ट्रासाठी नाही तर  राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी टोकाचे प्रयत्न करूनसुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?? असा चिमटा निलेश राणे यांनी काढला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काल  वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी त्या ठिकाणी असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानाखाली मारली असती, असे राणे म्हणाले होते. दरम्यान, रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  त्यानंतर दिवसभर चाललेल्या नाट्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात दाखल करण्यात आले होते. तेथे रात्री उशिरा त्यांना जामीन मंजुर झाला होता.   

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना