कोल्हापूर : राज्य सरकारने पूर्ण विचाराअंती ज्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली, त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरविणे हे अत्यंत चुकीचे आहे. हा राज्य सरकारच्या अधिकारामध्ये केलेला हस्तक्षेप आहे. या निर्णयामुळे ज्यांची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने कमी केली होती, त्या नेत्यांना (माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील) चांगली झोप तरी लागेल.
काहींना उगाचच पोलिसांचा जथ्था सोबत घेऊन फिरायची भारी हौस असते, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. पवार म्हणाले, सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने घेतला होता. मात्र, असे असताना केंद्राने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे हे जरा गमतीशीरच आहे. मलाही त्याचे आश्चर्य वाटले. त्या संबंधित नेत्यांनी त्याची मागणी केली असेल. आता सुरक्षा व्यवस्था मिळाल्याने त्यांना चांगली झोप लागेल.
Web Title: Narayan Rane and Chandrakant Patil will get a good sleep says sharad pawar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.