शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

माझा अनुभव हीच माझी ताकद : ॲड. आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 5:57 AM

Ashish Shelar News : माझ्या सोबत असणारा माझा अनुभव हीच माझी ताकद असल्याने आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आम्हीच जिंकू, हे निश्चित असल्याचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले.

मुंबई : माझ्या सोबत असणारा माझा अनुभव हीच माझी ताकद असल्याने आगामी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आम्हीच जिंकू, हे निश्चित असल्याचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. मुंबईत बीकेसी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ३ फेब्रुवारी रोजी गुरुग्राम येथे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आशिष शेलार रिंगणात उतरले आहेत.या वेळी शेलार म्हणाले, भारतीय बॉक्सिंग क्षेत्रात आम्हाला बदल घडवायचा आहे. काही त्रुटींमुळे तसेच अनेक निर्णय उशिरा घेतल्यामुळे रिओ ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये आपण कमी पडलो. या त्रुटी आम्ही निवडून आल्यास भरून काढणार आहोत. भारतातील तळागळातील खेळाडूंना सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.  या सर्व गोष्टी भारतातील सर्व राज्यातील बॉक्सिंग असोसिएशनला सोबत घेऊनच करायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय बॉक्सिंगला स्पॉन्सर मिळणे कठीण जात आहे. त्यामुळे बॉक्सिंगसाठी टायटल स्पॉन्सर आणण्यासाठी आमच्याकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. विरोधकांनी आमच्या समोर आधीच हार मानली आहे. मागील अनेक दिवसांपासून निवडणुकीची तारीख पुढे ढकलणे तसेच निवडणुकीत विविध अडथळे आणण्याचे काम विरोधक करीत होते.मी मुंबईतील कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी असल्याने कॉलेज जीवनापासूनच क्रीडा क्षेत्राशी माझा जवळचा संबंध आहे. त्यानंतर मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो आहे. २०१६ साली वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटीच्या कमिटीचा सदस्य राहिलो आहे. त्याचप्रमाणे मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा चेअरमनदेखील राहिलो आहे. माझ्यासोबत माझा अनुभव आहे त्याचप्रमाणे माझे केंद्र सरकारसोबत चांगले संबंध असल्याने बॉक्सिंगला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणे हे माझे ध्येय असल्याचे ते म्हणाले. या वेळी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य जय कवळी, सरचिटणीस अनिल कुमार मिश्रा, डॉक्टर सी. बी. राजे, राजेश देसाई व असित बॅनर्जी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारPoliticsराजकारण