शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

 ''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:41 IST

योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे.

नवी दिल्ली- योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हटल्याचा वाद थंड होत नाही, तोच योगींनी मुस्लिम लीगच्या आडून मुस्लिमांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आक्रमक प्रचार करत असून, विरोधी पक्षांना धारेवर धरत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगला व्हायरस असं म्हटलं आहे. तसेच या व्हायरसनं काँग्रेस संक्रमित झाल्याचीही टीकाही त्यांनी केली आहे. तर कालच राहुल गांधींवर हल्लाबोल करताना योगी म्हणाले होते की, केरळमध्ये देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर काँग्रेसचा गुप्त अजेंडा आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगवर जहरी टीका केली आहे. मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल, अशी भीती योगींनी व्यक्त केली आहे.उत्तराखंडमधल्या काशीपूरमधील रॅलीत योगी म्हणाले, देशाला शेकडो वर्षांनी 1947 स्वातंत्र्यता मिळाली. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या देशाचं दुर्भाग्यपूर्ण पद्धतीनं विभाजन करण्यात आलं. मुस्लीम लीगमुळेच देशाचं विभाजन झालं. राहुल गांधींनी केरळमधून उमेदवारी अर्ज भरला असून, त्याचा मुस्लिम लीगबरोबर सीक्रेट अजेंडा आहे. हे ती संघटना आहे, जी देशाच्या विभाजनाचं कारण ठरली. काँग्रेसचा मुस्लिम लीगबरोबर असलेला सीक्रेट अजेंडा देशाला कुठे घेऊन जाणार आहे आणि काँग्रेस देशात कशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करू इच्छिते.अफस्पा हटवून काँग्रेस सुरक्षा यंत्रणांना कमजोर करू इच्छिते. काँग्रेसनं स्वतःची आत्मा आणि स्वाभिमान देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांकडे गहाण ठेवला आहे. काँग्रेसला फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर काम करायचं आहे. उत्तराखंडातल्या अनेक गावातल्या मुलांनी देशसेवेला प्राधान्य दिलं आहे. जाहीरनाम्यात काँग्रेसनं देशद्रोही कलम 124 ए संपवण्याच्या दिलेल्या आश्वासनावर योगींनी टीका केली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा