शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

मुफ्ती, अब्दुल्लांना देशाचे तुकडे करू देणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:53 IST

जम्मू-काश्मीरमधील तीन पिढ्या बरबाद करणाऱ्या अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांना या देशाचे तुकडे करू देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला आहे.

कठुआ : जम्मू-काश्मीरमधील तीन पिढ्या बरबाद करणाऱ्या अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांना या देशाचे तुकडे करू देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान हवा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे भले करायचे असेल तर अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांचा पराभव केला पाहिजे. या कुटुंबीयांनी माझ्यावर हवी तेवढी टीका करावी पण त्यांचे कोणतेही कारस्थान मी यशस्वी होऊ देणार नाही.पंतप्रधान कार्यालय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सभा घेतली.ते म्हणाले की, संरक्षण दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (अफस्पा) काश्मीरमधून रद्द करू असे आश्वासन काँग्रेस पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यात दिले आहे. स्वत:ला देशभक्त म्हणविणारा पक्ष अशी भाषा कशी काय करू शकतो? काँग्रेसपक्ष सत्तेवर आल्यास त्यामुळेसंरक्षण दलांचे खच्चीकरणहोईल. जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजिलेल्या समारंभात उपराष्ट्रपतींना शहिदांना अभिवादन केले. मात्र या समारंभाला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंह उपस्थित नव्हते. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल मी कधीच शंका उपस्थित केलेली नाही. पण कॅ. अमरिंदरसिंह हे एका परिवाराच्या आरत्या ओवाळण्यात व्यग्र असल्याने ते या कार्यक्रमाला आले नसावेत. काश्मीरी पंडितांचे त्या राज्याच्या खोºयात पुनर्वसन करण्याबाबत भाजप कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत असा दावाही मोदी यांनी केला.>सप, बसपला लागणार अखेरची घरघरअलिगढमधीलसभेत मोदी म्हणाले की, बसप,सपसारखे जे पक्ष उत्तर प्रदेशमधून लोकसभेच्या ४० जागाही लढवत नाहीत ते या देशाचे पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहात आहेत. देशात उत्तर प्रदेशला मानाचे स्थान मिळवून देण्यात हे पक्ष कमी पडले. जातीयवादी राजकारणामुळेच या पक्षांच्या पदरी अपयश आले. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर सप, बसपला अखेरचीघरघर लागेल.मोदींनी सांगितले की, दुर्बल घटकातील एक व्यक्ती उपराष्ट्रपतीपदी विराजमान आहे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकदआहे. त्यामुळेच एक चहावालाही पंतप्रधान बनू शकला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019