शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल

By बाळकृष्ण परब | Updated: February 12, 2021 10:40 IST

Mamata Banerjee Criticize Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे नाव घेऊन केलेल्या हल्ल्याला ममता बॅनर्जींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देअमित शाहा यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषेमधून येतो अहंकाराचा वास तुम्ही सातत्याने आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. मात्र तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले?

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य प्रतिस्पर्धी बनलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे नाव घेऊन केलेल्या हल्ल्याला ममता बॅनर्जींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच केंद्राने राज्याला दिलेल्या निधीचा तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपाने सिद्ध करावा आणि आरोप सिद्ध न झाल्यास मोदी सरकारने राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.कोलकातामध्ये बिगरशासकीय संघटना आणि इतर संघटनांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) अमित शाहांवर हल्लाबोल केला. अमित शाहा (Amit Shah) यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषेमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच तुम्ही सातत्याने आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. मात्र तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी विचारला. (Mamata Banerjee Criticize Amit Shah )यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यामध्ये भाजपाची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वांना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरून लढणारी महिला आहे. मी अखेरपर्यंत संघर्ष करेन.एक निष्पक्ष खेळ होऊ द्या. डावे आणि काँग्रेस भाजपाच्या संघात असू शकतात. मात्र आम्ही एकट्याने लढू. मी केवळ एक गोलकिपर बनेन. बघुया तुम्ही किती गोल करता ते. मी सर्व बिगरशासकीय संघटना, स्वयंसहायता समुहांना आवाहन करते की, त्यांनी बंगालचा गौरव आणि बंगालची संस्कृती वाचवा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAmit Shahअमित शहाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल