शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Video: माजी मंत्री पोलिसांना म्हणाले, "तुम्ही सरकारचे कुत्रे झाले", त्यावर अधिकाऱ्यानं दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:32 IST

MPSC Student Protest in Amravati: अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही

ठळक मुद्देतुम्ही आंदोलन केलंय त्यावर आम्हाला नियंत्रण आणावं लागेलतुम्ही आम्हाला शहाणपणा कसा शिकवता? असा प्रश्न पोलिसांनी केलाकोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा

अमरावती – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला, या निर्णयामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला, पुण्यात सुरू झालेलं आंदोलन राज्यभरात पोहचलं, ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, यात अमरावती येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॉलर पकडून जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं, यावरून माजी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांनामध्ये बाचाबाची झाली.( Clashes between Anil Bonde and Police when MPSC Students Protest Against Thackeray Government)

अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही, तर तुम्ही आंदोलन केलंय त्यावर आम्हाला नियंत्रण आणावं लागेल, तुम्ही आम्हाला शहाणपणा कसा शिकवता? असा प्रश्न पोलिसांनी केला. त्यावर अनिल बोंडे यांनी एवढ्या मुलामुलींना तुम्ही आतमध्ये कोंडलं, तुम्हाला समजत नाही का? असा प्रतिप्रश्न केला होता.

पोलीस अधिकारी आणि अनिल बोंडे यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढत असतानाच बोंडे यांनी तुम्ही सरकारचे कुत्रे आहात म्हणून हिणवलं, त्यावर संतप्त अधिकाऱ्यानेही तुम्ही पण कुत्रेच असल्यांच प्रत्युत्तर दिलं, यानंतर पोलिसांनी अनिल बोंडे यांना ताब्यात घेतले.

नेमकं काय घडलं?

आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून बाहेर काढण्यासाठी सरसावलेले माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना एका पोलीस उपनिरीक्षकांनी मज्जाव केला. विद्यार्थी हे  स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत,असे बोंडे म्हणाले. मात्र, कोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेता. महिला पोलीस सोबत नाही, त्या काही चोर नाहीत, असा मुद्दा बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असेही ते म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, असे चोरमले म्हणाले.  तेव्हा बोंडे यांनी उसळून ‘चोरमले, तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ असे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे व चोरमले यांच्यातील वातावरण तापले. बोंडे यांनाच ताब्यात घेण्याच्या सूचना चोरमले यांनी दिल्या. पोलीस वाहनात त्यांना आयुक्तालयात नेण्यात आले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीAnil Bondeअनिल बोंडेPoliceपोलिस