शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे मंत्री अडचणीत; हजार कोटींच्या संजीवनी घोटाळ्यात उच्च न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:59 IST

Sanjivani society Fraud: संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आणि बनावट रेकॉर्ड रजिस्टर दाखवून गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे.

जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटीव्ह सोसायटी घोटाळा प्रकरणी केंद्रीय जलऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांना नोटीस पाठविली आहे. न्यायालयाने या प्रकरणी आणखी १७ जणांना नोटीस पाठविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजस्थानच्या राजकारणात या प्रकरणावरून मोठी खळबळ उडालेली आहे. 

काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नावरून तसेच आमदारांची खरेदी करण्यावरून केंद्रीय मंत्री शेखावत हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निशान्यावर आलेले आहेत. आता न्यायालयाने नोटीस पाठविल्याने पुन्हा वातावरण तापलेले आहे. देशभरातील दीड लाख गुंतवणूक दारांचे एक हजार कोटींहून अधिक पैसे हडपण्यात आले आहेत. यावर संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शेखावत व त्यांच्या पत्नीसह १४ पक्षकारांना नोटीस पाठविली आहे. 

संजीवनीच्य़ा गुंतवणूकदारांनी घोटाळ्यातील रक्कम मिळविण्यासाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी संजिवनी पीडित संघच्या नावे एक संस्था स्थापन केली होती. त्यांनीच ही याचिका दाखल केली होती. विक्रम सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फसवणूक केली आणि बनावट रेकॉर्ड रजिस्टर दाखवून गुंतवणूकदारांना भ्रमात ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमध्ये शेखावत यांचेही नाव असून या घोटाळ्याची ईडी, SFIO, CBI कडून चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

पाच महिन्यांपूवी काँग्रेसचे सरकार पाडण्याचा आरोप झाल्यानंतर शेखावत यांनी सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीला तयार असल्याचे सांगितले होते. तपास यंत्रणांनी मागितलेले सर्व कागदपत्र दिले आहेत. गेल्य़ा १२ महिन्यांपासून तपास सुरु असल्याचे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthanराजस्थान