शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे.

पाटणाः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्यांनी लोक जनशक्ती पार्टी(लोजपा)चे उमेदवार चिराग पासवान यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना  त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ, मोदी असू देत किंवा दुसरं कोणी, कोणीही आरक्षणाला हटवू शकत नाही.काँग्रेसनं आपल्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कशा प्रकारचा व्यवहार केला हे सगळ्यांनाच माहीत आहे. काँग्रेसनं त्यांच्या पराभव करण्यासाठी षडयंत्र रचलं. परंतु आजच्या तरुण पिढीला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मोदी म्हणाले, काँग्रेस बाबासाहेबांबरोबर कसं वागलं. त्यांना हरवण्यासाठी किती षडयंत्र रचली. स्वतःच्या परिवारातील सदस्याला काँग्रेसनं भारतरत्न दिलं, परंतु ते बाबासाहेबांना विसरले. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या प्रयत्नांमुळेच बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आज जग भारताबरोबर उभं आहे, परंतु विरोधक पाकिस्तानसारखेच बोलत आहेत.भारतातले विरोधी पक्ष हे राजकीय कमी, पण पाकिस्तानचे प्रवक्तेच जास्त वाटतात. जो कोणी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, त्यांना योग्य वेळी धडा शिकवू, असंही मोदी म्हणाले आहेत. मग ते नक्षलवाद्यांना समर्थन देणारे असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. देशाची सुरक्षा, काश्मीर मुद्दा आणि आपले जवान, सुरक्षा यंत्रणांवर विरोधकांकडून होत असलेली टीका देशवासीयांनी विसरू नये आणि निवडणुकीत त्याचा हिशेब करून टाका, विरोधकांना चांगलाच धडा शिकवा, असं आवाहनही मोदींनी केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक