शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

"मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:14 IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आलिंगन देणारे व हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयला पठाणकोट येथे चौकशीसाठी येण्याचे आमंत्रण धाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आलिंगन देणारे व हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयला पठाणकोट येथे चौकशीसाठी येण्याचे आमंत्रण धाडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे पुरावे मागणारे विरोधी पक्ष हे पाकिस्तानचे पोस्टर बॉइज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यावर टोला हाणताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही नव्हे तर मोदीच पाकिस्तानचे पोस्टरबॉय आहेत. नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी मोदी यांनी त्यांना जाहीरपणे आलिंगन दिले होते. तसेच शरीफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कसलेली अधिकृत निमंत्रण मिळालेले नसतानाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानात गेले होते. बालाकोटवर केलेल्या हल्ल्यामुळे नेमके काय साधले, असा सवाल पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी केला आहे, याची आठवणही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी करून दिली.राफेल दस्तावेजांच्या झालेल्या चोरीबद्दल जर चौकशी करण्यात येते, तर विमाने खरेदीतील ३० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, राफेल व्यवहाराबाबत भारतीय शिष्टमंडळाकडून बोलणी सुरू असताना काही जणांकडून समांतर बोलणीही सुरू होती. या विमानांच्या खरेदीला पंतप्रधानांनी मुद्दामहून उशीर केला. कारण अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून देण्याचा मोदींचा इरादा होता. न्याय सर्वांसाठी समान असावा. मात्र केंद्र सरकार मोदी यांना वाचवत आहे.>राहुलना पाकचे प्रमाणपत्र हवे का?राफेल विमाने व्यवहाराबाबत राहुल गांधी खोटेनाटे आरोप करीत आहेत. त्यांचा ना भारतीय हवाई दलावर विश्वास आहे ना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर. राफेल विमानांबाबत राहुल गांधी यांना पाकिस्तानकडून प्रमाणपत्र हवे आहे का, असा सवाल भाजपाने विचारला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, राफेल व्यवहारात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे म्हटलेले आहे. राहुल गांधी यांनी कॅगवरही अविश्वास दाखविला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदी