शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

छत्रपती शिवाजी पार्कात काका-पुतण्या आमनेसामने?; राज ठाकरेंच्या 'त्या' पत्रामुळे वातावरण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 11:04 AM

mns writes to bmc regarding Chatrapati shivaji park revamp: राज ठाकरेंचे पालिकेला पत्र; सीएसआर फंडातून पार्काचं नुतनीकरण करू देण्याची मागणी

मुंबई: शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (ShivSena and MNS) जडणघडणीत छत्रपती शिवाजी पार्कला (Chatrapati Shivaji Park) अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोन्ही पक्षांच्या छत्रपती शिवाजी पार्कातल्या सभांना मोठी गर्दी होते. शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्त्वानं अनेकदा याच मैदानावरून विरोधकांना आव्हान दिलं. याच मैदानातून ठाकरेंनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता याच मैदानावरून शिवसेना-मनसे यांच्यातला वाद पेटण्याची शक्यता आहे. (mns writes to bmc regarding shivaji park revamp)‘राज’दरबारी प्रश्न निकाली! राज ठाकरेंचा एकच फोन अन् टोलमाफ, मावळवासियांनी मानले आभारमनसेनं छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं आहे. मनसे सीएसआर निधीतून पार्काचं नुतनीकरण करेल, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. '२०१२-१७ या कालावधीत नाशिक महापालिकेत सत्ता असताना आम्ही सीएसआर निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण सीएसआर निधीतून पूर्ण करू,' असं पत्र मनसेनं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलं आहे.काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाचीही कृष्णकुंजवर धाव; राज ठाकरेंनी फोन केला अन्...'आम्ही छत्रपती शिवाजी पार्कात सीएसआर निधीच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला होता. पण २०१७ मध्ये बंद झाला. आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे आम्हाला सीएसआर निधीतून छत्रपती शिवाजी पार्कचं नुतनीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी. पालिकेकडे निधीची चणचण असल्यानं त्यांनी नुतनीकरणाची निविदा प्रक्रिया थांबवावी,' असं मनसेनं पत्रात म्हटलं आहे. राज ठाकरेंचं (Raj Thackeray) कोणतंही पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं चहल यांनी सांगितलं आहे. स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं निविदा प्रक्रियेला सुरुवातदेखील केली आहे.विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) छत्रपती शिवाजी पार्कच्या नुतनीकरण प्रकल्पात लक्ष घातलं आहे. त्यांनी काही वेळा छत्रपती शिवाजी पार्कला भेट देऊन तिथली पाहणीदेखील केली आहे. तर राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच पालिका अधिकाऱ्यांसोबत  छत्रपती शिवाजी पार्कला जाऊन आले. त्यांनीही पार्क आणि परिसराची पाहणी करून नुतनीकरण प्रकल्पाबद्दल काही सूचना केल्या होत्या.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका