शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिले; किशोरी पेडणेकरांनी राजीनामा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 19:09 IST

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.

ठळक मुद्देकोरोना काळात राजकारण करु नका पण भ्रष्टाचार करा असं कामकाज भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. नियम डावलून महापौरांनी स्वत:च्या मुलालाच दिलं कोविड सेंटरचं कंत्राट

मुंबई – कोविड काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून(Shivsena) सुरु आहे असा घणाघाती आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोविड सेंटरच्या नावाखाली शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरु आहे याचा जाब मनसे विचारणार असं त्यांनी सांगितले आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar)  यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महापौराचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आलं असे ते म्हणाले.

कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोरोना काळात राजकारण करु नका पण भ्रष्टाचार करा असं कामकाज करणार असाल तर मनसे गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरावा असं आवाहन मनसेने केले आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेKishori Pednekarकिशोरी पेडणेकर