शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे इन ऍक्शन मोड; कल्याणची जबाबदारी तीन खास शिलेदारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:29 IST

गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली

कल्याण :  राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या गळतीचा चांगलाच धसका घेतला आहे. गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली आहे. तसेच पक्षाला एकामागोमाग बसणारे धक्के, तसेच गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांकडे केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभारी’ म्हणून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.मनसेलाही याआधी २०१४ ची लाेकसभा आणि २०१५ च्या केडीएमसी निवडणुकांतही असे धक्के बसले हाेते. आता मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मनसेला रामराम केला आहे. त्यांच्यावर साेशल मीडियावरून टीकेची झाेड उठली आहे. त्यांच्या पक्षबदलाबाबत राजकीय तज्ज्ञ तर्कवितर्क लढवत आहेत. तसेच मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे. निवडणुकीत फटकापक्ष स्थापनेनंतर २०१० मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीत तब्बल २८ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेचे २०१५ निवडणुकीत मात्र नऊ नगरसेवक निवडून आले हाेते. पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसलेले हे धक्के लक्षात घेता ‘डॅमेज कंट्रोल’-साठी प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे