शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

By कुणाल गवाणकर | Updated: November 19, 2020 18:22 IST

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मनसे सोबतच्या युतीबद्दलच्या विधानावर नांदगावकरांचं उत्तर

मुंबई: भारतीय जनता पक्षानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनंदेखील फडणवीस यांना आव्हान दिलं. त्यामुळे मुंबईत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार!मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे. मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागलीप्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. 'त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला आहे,' असा टोला नांदगावकर यांनी लगावला. दरेकर आधी मनसेत होते. मनसेकडूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मागाठाणे मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.सोमवारपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...; वाढीव वीज बिलांवरून मनसेचा ठाकरे सरकारला इशाराकाय म्हणाले देवेंद्र फडणवीस?मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.काय म्हणाले संजय राऊत?देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv Senaशिवसेना