शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत कमी झाला मनसेचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:49 IST

आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले

- शेफाली परब-पंडित मुंबई : आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र दक्षिण मुंबईत गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर असलेले मनसेचे इंजीन पुढच्या निवडणुकांमध्ये धडाडले नाही. पालिका निवडणुकीत निवडून आलेले सहा नगरसेवकही शिवसेनेत गेल्यामुळे मनसे तेथेही नामशेष झाले.त्यामुळे मनसेचा प्रभाव कमी होताना दिसून आला आहे. गिरगाव, ताडदेव, भायखळा, शिवडी या भागांमध्ये असलेली मनसेची काही मतेच तेवढी काँग्रेसच्या पारड्यात पडतील. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेने दुसरा क्रमांक मिळवत शिवसेनेचा पत्ता साफ केला. पण हाच प्रभाव मनसेला पुढच्या पाच वर्षांत राखता आला नाही.मधल्या काळात मनसेतील मतभेद, दुफळी उजेडात आल्यामुळे मतदारांमध्ये या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा कमी होत गेल्या. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे तिसºया क्रमांकावर फेकली गेली. तरीही या पक्षाने ८४ हजार मते मिळविली होती. काँग्रेसला संधी देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाबाबत पक्षांतर्गतच संभ्रम आहे. त्यामुळे या वेळेस तरी मनसेची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे नाहीत.

>मनसेने लढविलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचा प्रभाव दक्षिण मुंबईमध्ये कमीच होताना दिसून आला. २००९ मध्ये एक लाख ६० हजार मते मिळवणाºया मनसेने २०१४ मध्ये ८४ हजार मते मिळविली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी, वरळी, कुलाबा, मलबार हिल मतदारसंघात मनसेला सरासरी दोन ते सहा टक्केच मते पडली. भायखळ्यात १६ टक्के तर शिवडीत २० टक्के मते मिळाली होती.मुंबई महापालिकेतच मनसेचा झेंडा फडकत होता. २०१७ च्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले. त्यामुळे आता एकच मनसे नगरसेवक आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिण