शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:21 IST

Nana Patole on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.

Sanjay Gaikwad Nana Patole : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने वादंग निर्माण झाले. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांकडून महायुतीला लक्ष्य केले जात आहे. गायकवाडांच्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घेरले.  

"राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार", असे विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्याबद्दल नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला. 

नाना पटोले म्हणाले, "शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे."  

पटोलेंची मोदी-शाहांवर टीका

"पहिले भाजपाचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो. दुसरा भाजपाचा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतात. यावर नरेंद्र मोदी, अमित शाह मूग गिळून गप्प असतात", अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? शिंदे-फडणवीसांना सवाल

नाना पटोले पुढे म्हणाले, "आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे. या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही मानता की नाही?", असा सवाल पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत.

"संविधानावर बोलायची तुमची लायकी आहे का?" 

"संजय गायकवाड यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर, पंजा काय करेल हे कळणारही नाही. आधी तुमची लायकी आहे का संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची? हे एकदा पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा... जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच", असा इशारा नाना पटोलेंनी दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSanjay Gaikwadसंजय गायकवाडEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधी