शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते, आता त्यांचा प्रभाव कमी झालाय; तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 13:22 IST

TMC On Mithun Chakraborty : रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आक्रमक भूमिका घेत आपण कोब्रा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

ठळक मुद्देरविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आक्रमक भूमिका घेत आपण कोब्रा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.यापूर्वी ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवरही गेल होते.

तृणमूल काँग्रेसमधून राज्यसभेवर गेलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी एका प्रकरणी नाव आल्यानंतर राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर राजकारणापासून ते दूर गेले होते. परंतु चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामागे गरीबांचं मदत करणं हे आपलं स्वप्न आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. "लोकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासार्हता, कोणताही सन्मान आणि प्रभाव राहिलेला नाही. मिथुन चक्रवर्ती हे मूळ नक्षलवादी होते आणि यापूर्वी त्यांनी चार पक्ष बदलले आहेत," असं म्हणत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी निशाणा साधला. "मिथुन चक्रवर्ती आजचे स्टार नाहीत. ते यापूर्वी स्टार होते. त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले. ते मूळ नक्षलवादी होते. त्यानंतर ते सीपीएममध्ये गेले, त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आलं," असंही सौगत रॉय यावेळी म्हणाले. "भाजपनं अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी ईडी केसची धमकी दिली आणि त्यांनी राज्यसभा सोडली. आता ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांची विश्वासार्हता, सन्मान राहिला नाही. त्यांचा लोकांमध्येही आता कोणता प्रभाव राहिला नाही," असं वृत्त एएनआयनं सौगत रॉय यांच्या हवाल्यानं दिलं आहे. मी कोब्रा.. दंश केल्यास फोटो लागेलज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत उपस्थित होते. "मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असंते म्हणाले होते.  

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१