लाखोंचे दागिने, कोटीची संपत्ती, पण घरात शौचालय नाही; काँग्रेस महिला उमेदवाराचा अर्ज बाद केला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 04:18 PM2021-02-16T16:18:30+5:302021-02-16T16:20:10+5:30

Gujrat, Ahmadabad Election : भाजपाने यावर टीका केली आहे. त्यांच्याकडे 15 लाखांचे दागिने, 10 लाखांची एसयुव्ही आणि शहरात फ्लॅट अशी संपत्ती होती, त्या शहरातच राहत होत्या. केवळ कागदोपत्री त्या कंभामध्ये राहत असल्याचे दाखविले. त्यांना कधी मूळ घरी शौचालय बांधावेसे वाटले नाही, त्या इथला विकास काय करणार, असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले. 

Millions of jewels, crores of wealth, but no toilet in the house; rejects candidate's application | लाखोंचे दागिने, कोटीची संपत्ती, पण घरात शौचालय नाही; काँग्रेस महिला उमेदवाराचा अर्ज बाद केला...

लाखोंचे दागिने, कोटीची संपत्ती, पण घरात शौचालय नाही; काँग्रेस महिला उमेदवाराचा अर्ज बाद केला...

Next

अहमदाबाद : 15 लाखांचे सोन्याचे दागिने, नरोदामध्ये एक फ्लॅट आणि रोज दहा लाखांच्या एसयुव्हीमधून फिरणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्याला मोठी नामुष्की सहन करावी लागली आहे. या नेत्याला घरात शौचालय नसल्याचा मोठा फटका बसला आहे. अहमदाबाद जिल्हा पंचायतसाठी सिंगरवा जागेसाठी तिने अर्ज भरला होता. 


काँग्रेसच्या उमेदवार कृना पटेल यांनी पंचायत निवडणुकासाठी अर्ज भरला होता. त्यांच्या कान्हा गावातील घरात शौचालय नाही, यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यांच्या अर्जाच्या छाननी दरम्यान, भाजपाच्या प्रतिस्पर्ध्याने यावर प्रश्न उपस्थित करत आक्षेप घेतला. त्याने त्याच्या शपथपत्रात खोटा उल्लेख केल्याचे म्हटले. कृनाच्या घरामध्ये शौचालय नसल्याचा दावा त्याने काला होता. तो खरा निघाला आणि काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला. 

नरेंद्र मोदींना शेवटची 2002 मध्ये भेटलेली, त्यांचा नावाचा 'त्रास'; पुतणी सोनल मोदी यांची प्रतिक्रिया


पटेल यांनी ओळखपत्र जोडले होते. त्यावर त्यांच्या गावाचा पत्ता होता. जर त्यांनी फ्लॅटचा पत्ता दिला असता तर त्यांची उमेदवारी गमवावी लागली नसती. कृना यांनी शपथपत्रात शौचालय असल्याचे म्हटले होते. निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणीवेळी त्यांना याबाबत विचारण्यात आले. त्यांनी यावर काहीच उत्तर दिले नाही. अखेर त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याला कृनाच्या घरी शौचालय आहे का विचारण्यात आले. या नेत्याने त्यांच्या मूळ घरी नसल्य़ाचे सांगितले. तिथेच अर्ज बाद होत असल्याचे जाहीर करण्यात आले. 


एसडीएमनी त्यांना ही गोष्ट लिखीत देण्यास सांगितली. भाजपाने यावर टीका केली आहे. त्यांच्याकडे 15 लाखांचे दागिने, 10 लाखांची एसयुव्ही आणि शहरात फ्लॅट अशी संपत्ती होती, त्या शहरातच राहत होत्या. केवळ कागदोपत्री त्या कंभामध्ये राहत असल्याचे दाखविले. त्यांना कधी मूळ घरी शौचालय बांधावेसे वाटले नाही, त्या इथला विकास काय करणार, असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले. 

Web Title: Millions of jewels, crores of wealth, but no toilet in the house; rejects candidate's application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.