शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांनी केलेल्या विधानानं चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Updated: November 20, 2020 17:35 IST

भाजप आमदार आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा

मुंबई: मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री व्हावी, असं विधान भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शेलार यांनी हे विधान केल्यानं याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेल्या विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. 'मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,' असं शेलार म्हणाले.भाजपकडून 'मिशन मुंबई'ची तयारी; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भातखळकरांवर मोठी जबाबदारीआशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर होती. त्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्याआधीच्या निवडणुकीत भाजपच्या जागा केवळ ३१ होत्या. शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं अतिशय घवघवीत यश मिळवलं. मात्र यंदा त्यांच्याकडे मुंबईऐवजी ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAtul Bhatkalkarअतुल भातखळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस