शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेसाठी आनंदाची बातमी! राज ठाकरे जोमात; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 06:49 IST

‘कृष्णकुंज’वर पुन:श्च हरिओम; राज ठाकरेंकडे गर्दी वाढली

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी सध्या मागण्या घेऊन येणाऱ्या शिष्टमंडळाची गर्दी वाढत आहे. मूर्तिकार, मुंबईचे डबेवाले, जिम मालक-चालकांपासून मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी ओघ वाढल्याने मनसेतही उत्साहाचे वातावरण आहे.ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विश्वस्त, संचालकांनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यानंतर राज यांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मोबाइलद्वारे चर्चा केली असता लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.अलीकडेच डोंगरी भागातील कोळी महिलांनी अनधिकृत मासे विक्रेत्यांवर कारवाईच्या मागणीसाठी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पालिकेनेही डोंगरी भागात तातडीने कारवाईचा बडगा उगारला होता. तर, मुंबईतील डबेवाल्यांनी लोकल प्रवासाच्या मागणीसाठी कृष्णकुंज गाठले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा देणारा निर्णय घेतला.अलीकडच्या काळात शिष्टमंडळांनी कृष्णकुंज गाठावे आणि राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवावे, असा शिरस्ता सुरू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी राज यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीला चाप लावण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवले होते.नव्या बदलाची नांदी?भाजप हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असताना राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर होणारी गर्दी अनेकांना अचंबित करणारी आहे. विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी भाजपे नेते सरकारविरोधात रान उठवत असताना राज ठाकरे यांच्याकडे वाढलेला ओघ ही नव्या राजकीय बदलांची नांदी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे