शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनहास की जगताप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 04:39 IST

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक आणि २०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली.

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई कॉंग्रेसच्या आगामी अध्यक्षांची नेमणूक लवकर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत मनहास व ज्येष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजीत सप्रा यांचीही नावे चर्चेत आहेत. संघटनात्मकदृष्ट्या डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून काम करून घेणारा, सर्वांना बरोबर नेणारा नेता म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक आणि २०२२च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहात डॉ. मनहास आणि भाई जगताप यांना एकत्र बसवून चर्चा केली. या दोघांनी संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर वैयक्तिक चर्चाही केली.

मनहास यांनी म्हाडाचे अध्यक्ष असताना १२००० मुंबईकरांना घर दिले होते. तर २००७च्या पालिका निवडणुकीत ७७ नगरसेवक निवडून आणले होते. त्यांना पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून ते अध्यक्ष म्हणून अधिक यशस्वी ठरतील, असे मत सर्वाधिक जणांनी मांडल्याचे समजते.

पाटील दिल्लीला रवानाआज सकाळी विमानाने पाटील हे दिल्लीला गेले असून कालच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा सविस्तर अहवाल ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या समोर ठेवतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई काँग्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाची औपचारिक घोषणा येत्या दोन-तीन दिवसांत दिल्लीहून केली जाईल.

टॅग्स :congressकाँग्रेस