शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कालिदासभूमी’त मंत्र्यांमध्येच ‘मंडुक’पुराण! महाविकास आघाडीमधील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 07:36 IST

Politics News : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमधील मतभेद अजूनही संपलेले नाहीत. सरकारमधील मंत्रीच एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

- आशिष दुबेनागपूर : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमधील मतभेद अजूनही संपलेले नाहीत. सरकारमधील मंत्रीच एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठात आयोजित एका समारंभात ही बाब स्पष्टपणे दिसून आली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिक्षणासंदर्भात केलेल्या दोन घोषणांबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सार्वजनिक मंचावरून आक्षेप घेतला. सोबतच ‘डराव डराव’ करणाऱ्या मंडुकाप्रमाणे नव्हे, तर सागरासारखे विचार करायला हवेत, असा सल्लादेखील देऊन टाकला.संस्कृत विद्यापीठात शुक्रवारी मातोश्री या विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामंत यांनी दोन घोषणा केल्या. यात सर्व वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव देणे व संस्कृत संशोधनाला वेग मिळावा यासाठी राज्यात संस्कृतचे चार उपकेंद्र सुरू करण्याबाबतच्या घोषणांचा समावेश होता. यासोबतच महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबईऐवजी रामटेकमध्ये करण्याचीदेखील त्यांनी घोषणा केली. मात्र, राऊत यांनी संस्कृत विद्यापीठात केवळ संस्कृतचे अध्ययन व संशोधनावरच जोर देण्याच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. पाली, प्राकृत व इतर भाषांचादेखील विचार झाला पाहिजे. कवी कालिदासांबाबत बोलत असताना नागार्जुनचा विसर पडायला नको. त्यांचेदेखील महत्त्व सांगायला हवे. संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यामागे केवळ संस्कृतच नव्हे, तर इतर भाषांचा विचारदेखील करण्याबाबत संकल्पना होती, असे राऊत म्हणाले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलावून विद्यापीठाचा कायदा बदलण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. महिला वसतिगृहांना ‘मातोश्री’चे नाव देण्यावर त्यांनी सामंत यांना शाब्दिक चिमटादेखील काढला.  

काय म्हणाले राऊत?विचार हे सागराप्रमाणे विशाल असायला हवेत. डराव डराव करणाऱ्या मंडुकांप्रमाणे विचार नकोत. सागरामध्ये मोठा देवमासादेखील आला तरी त्याचा समावेश करण्याची क्षमता असली पाहिजे. जोपर्यंत सागराप्रमाणे विचार करण्याची क्षमता विकसित होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाचा विकास होऊ शकत नाही. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणUday Samantउदय सामंतNitin Rautनितीन राऊत