शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधात ममता एकट्या पडल्या; काँग्रेस पुन्हा डाव्यांसोबत वेगळी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 18:02 IST

West Bengal politics: पुढील वर्षाच्या मध्यावर प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केल्याने बंगालमधील वातावरण तापलेले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री एकट्या पडल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तसेच गरज पडली तर पवार बंगालला जाणार असल्याचेही एनसीपीच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र, आज काँग्रेसने प. बंगालची निवडणूक पुन्हा एकदा डाव्यांसोबत मिळून लढविणार असल्याची घोषणा केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. 

पुढील वर्षाच्या मध्यावर प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केल्याने बंगालमधील वातावरण तापलेले आहे. या राजकीय लढाईत ममता बॅनर्जी यांचे खंदे शिलेदारच भाजपाने फोडल्याने ममता यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी टीएमसीविरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. 

काँग्रेसने पुन्हा टीएमसीविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्यांसोबत आघाडी करून निवडणुकीत उतरण्यावर काँग्रेसच्या हायकमांडने हिरवा झेंडा दाखविला आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरी यांनी ट्विट केले आहे. यामुळे 2016 सारखी काँग्रेस पुन्हा टीएमसीविरोधात उभी ठाकणार आहे. 

2016 चे चित्र काय होते? पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागा आहेत. 2016 मध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत आघाडी करत निवडणूक लढविली होती. तेव्हा काँग्रेस दुसरा मोठा पक्ष बनला होता. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तर सीपीएमला 26 आणि अन्य डाव्या पक्षांना काही जागा मिळाल्या होत्या. भाजपाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, आमदारांनी पक्षबदल केल्याने काँग्रेसचे आता 23 तर भाजपाकडे 16 आमदार आहेत. 

प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चापश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून सोमवारी चर्चा केली. प. बंगालमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभा  निवडणूक होणार असून, भाजपने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे विरोधकांची एकजूट नसल्याने तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, काँग्रेस, एमआयएम आदी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या फाटाफुटीचा भाजपला फायदा मिळू नये, यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका