ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले; जळगावमध्ये दोन गटांत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 10:42 AM2021-01-15T10:42:35+5:302021-01-15T10:43:03+5:30

Gram Panchayat Election: उमेदवारांनी नवीन मशीनची  मागणी केली.  या बुथवर आतापर्यंत  ७३ जणांनी  मतदान केले आहे.

Malfunction in EVM, polling stopped; Fighting between two groups in Jalgaon | ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले; जळगावमध्ये दोन गटांत हाणामारी

ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले; जळगावमध्ये दोन गटांत हाणामारी

Next

जामनेर जि. जळगाव : लोंढ्री ता. जामनेर येथील बुथ क्रमांक तीन वर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण  झाले. उमेदवारांनी नवीन मशीनची  मागणी केली.  या बुथवर आतापर्यंत  ७३ जणांनी  मतदान केले आहे.  नव्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. या मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली आहे. 


नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान सुरू
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळ पासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. अर्ज माघारीपर्यंत ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण  १  हजार ९५२ मतदान केंद्रांवर १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या निवडणुकीसाठी २ हजार ५६० बॅलेट युनिट तर तितकेच कंट्रोल युनिटचा वापर केला जात आहे.  ११ हजार ५४ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत असून त्यात ५ हजार ५५७ महिला उमेदवार आहेत.  निवडणुकीसाठी ४ हजाराहून अधिक पोलीस तैनात आहेत.
 

Web Title: Malfunction in EVM, polling stopped; Fighting between two groups in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.