शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 13:01 IST

Maharashtra Budget Session 2021: Maharashtra Vidhi Mandal Budget Session clash of Ajit Pawar and Devendra Fadnavis : वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेच्या विषयावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम, राज्यपालांकडून ठाकरे सरकारचं कौतुकवैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी केली. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधलं. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असं पवार म्हणाले."धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणाअजित पवारांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताचा देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातलं आता ओठांवर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस पवारांवर बरसले. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार