शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:10 IST

Maharashtra Assembly election NCP: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी बंडखोरी करत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

योगेश पांडे, नागपूरMahayuti Maharashtra Assembly election 2024: महायुतीत सर्व काही आलबेल असून जागावाटपावरून काहीच नाराजी नाही, असा सूर राज्य पातळीवर नेत्यांकडून लावण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तिकिटावरून नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नागपुरात महायुतीतील पहिली बंडखोरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी पुर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

मागील तीन विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे हे पुर्व नागपुरातून विजयी झालेले आहेत. यावेळीदेखील भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र नागपुरातूनच या भूमिकेला सुरूंग लागताना दिसतो आहे.

आभा पांडे निवडणूक लढवण्यावर ठाम

आभा पांडे यांनी काहीही झाले तरी पूर्व नागपुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले, तर जनतेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढेन अशी भूमिका त्यांनी मांडली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांची मनधरणी करतील अशी चर्चा होती. मात्र गुरुवारी आभा पांडे यांनी त्यांच्या समर्थकांसोबत निवडणूक अर्ज दाखल केला. यामुळे पुर्व नागपुरात खोपडे यांना त्यांच्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याविरोधात लढावे लागणार आहे.

निवडणूक लढवण्याबद्दल आभा पांडे काय बोलल्या?

आभा पांडे यांना २०१७ साली झालेल्या मनपा निवडणूकीत जवळपास ११ हजार मते मिळाली होती. शिवाय त्यांच्या प्रभागातील अनेक बुथ पुर्व नागपुरात येतात. मी कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. जनतेच्या मागणीवरूनच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे पांडे यांनी सांगितले.

फटका कुणाला बसणार ?

महाविकासआघाडीकडून पुर्व नागपुरचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. पांडे व पेठे यांच्यातदेखील राजकीय वाद आहे. आता पांडे यांच्या अपक्ष उमेदवारीचा नेमका फटका कुणाला बसणार यावरून विविध कयास वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-east-acनागपूर पूर्वMahayutiमहायुती