शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:11 IST

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण व्हावे, यासाठीच भाजपानं षडयंत्र रचून भीम आर्मीची स्थापना केली आहे. भाजपानं दलितांची मतं बसपाऐवजी भीम आर्मीला मिळावीत म्हणून चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे. भीम आर्मीची स्थापना ही दलितांच्या मतांचं धुव्रीकरण करण्याच्या षड्यंत्रातून झालेली आहे.मायावतींनी रविवारी ट्विट करत भाजपाआडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण करून भाजपाला फायदा व्हावा या उद्देशानंही भाजपानं भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. ही संघटना भाजपानं षड्यंत्रानं बनवली आहे. भाजपा दलितविरोधी मानसिकतेचं घाणेरडं राजकारण करत असल्याची टीकाही मायावतींनी केली आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये मायावतींनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपानं गुप्तचर म्हणून चंद्रशेखर यांना बीएसपीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचं षडयंत्र यशस्वी झालं नाही. अहंकारी, निरंकुश आणि जातीयवादी भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपलं एक एक मत बहुमूल्य असल्याचंही मायावती मतदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभं करू शकत नाही म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं आझाद यांनी म्हटलं होतं.  मोदींना पराभूत करून त्यांची गुजरातला रवानगी करणार असल्याचे आझाद यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध आपण वाराणसीतून संघटनेतील मजबूत व्यक्ती उभा करणार आहोत. परंतु योग्य उमेदवार न मिळाल्यास खुद्द मोदी यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :mayawatiमायावतीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझादNarendra Modiनरेंद्र मोदी