अर्थमंत्रालयात कमी IQ वाले, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही; भाजपा खासदाराकडून बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:07 PM2021-05-30T17:07:43+5:302021-05-30T17:08:36+5:30

Subramanian Swamy Talking in American media Interview: अमेरिकेचा चॅनल Valuetainmentच्या पॅट्रिक बेट डेव्हीड यांनी स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी डेव्हीड यांनी स्वामींना महात्मा गांधी, नेहरुंवर काही प्रश्न विचारले. यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आले.

low IQ people in the finance ministry, Narendra Modi does not understand the economy: Subramanian Swamy | अर्थमंत्रालयात कमी IQ वाले, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही; भाजपा खासदाराकडून बोचरी टीका

अर्थमंत्रालयात कमी IQ वाले, मोदींना अर्थव्यवस्थाच समजत नाही; भाजपा खासदाराकडून बोचरी टीका

Next

भाजपाचे खासदार  सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) बोचरी टीका केली आहे. भारताच्या अर्थमंत्रालयामध्ये कमी बुद्धी, कमी आयक्यू वाले लोक असून मोदींना अर्थव्य़वस्थेबाबत काही कळत नसल्याचे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी अर्थ मंत्रालय मोदींच्याच ताब्यात देण्याचे वक्तव्य स्वामी यांनी केले होते. (Subramanian Swamy said PM like low IQ people, because they listen and did work.)


'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...

अमेरिकेचा चॅनल Valuetainmentच्या पॅट्रिक बेट डेव्हीड यांनी स्वामी यांची मुलाखत घेतली. यावेळी डेव्हीड यांनी स्वामींना महात्मा गांधी, नेहरुंवर काही प्रश्न विचारले. यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आले. स्वामींनी गांधींबद्दल चांगले शब्द काढले, परंतू नेहरुंबाबत त्यांनी चांगले मत नसल्याचे स्पष्ट केले. 
डेव्हीड यांनी स्वामींना त्यांच्या मोदींबाबतच्या भोळे आणि अनुभव नसलेले अर्थशास्त्री या वक्तव्याची आठवण करून दिली. तसेच मोदींना मंत्रिमंडळात अर्थमंत्री करण्याची मागणीही एकदा स्वामींनी केल्याचे ते म्हणाले. यावर स्वामी हसले. मोदी माझे मित्र आहेत आणि त्यांना मी 70 च्या दशकापासून ओळखतो. मला असे म्हणायचे होते की, मोदींना अर्थव्यवस्थेबाबत काहीच माहिती नाहीय. हाच शब्द त्यांच्यासाठी जास्त योग्य आहे. 


देशाच्या अर्थमंत्रालयात कमी आयक्यू असलेले लोक आहेत. मी पंतप्रधानांचा जुना मित्र असल्याने मोदींना ओळखतो. त्यांनाही कमी आयक्यूवाले लोक आवडतात. ते आज्ञाधारक लोकांना पसंत करतात. हीच त्यांची कमजोरी आहे. स्वतंत्र रुपाने काम करणारे लोक त्यांना आवडत नाहीत. मला त्यामुळेच दूर ठेवण्यात आले आहे, असे स्वामी म्हणाले. जनसत्ताने याबाबतची बातमी दिली आहे. 


सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. 
 

Web Title: low IQ people in the finance ministry, Narendra Modi does not understand the economy: Subramanian Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.