शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

बारा नावांची यादी हरवली, ती राज्यपालांकडे सापडली

By यदू जोशी | Published: May 25, 2021 7:12 AM

Maharashtra POlitics News: राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच ताणतणाव आहे.

- यदु जोशीमुंंबई : ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, तेच आम्हाला सापडलं’, अशाच धर्तीवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांसाठीची यादी हरवली, अशी चर्चा होत असतानाच ती यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याची माहिती सोमवारी मिळाली. यादी कुठेही गेलेली नाही, असे राजभवनच्या अधिकृत सूत्रांनी लोकमतला सांगितले. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच ताणतणाव आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनवर जावून १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविली होती. तेव्हापासून राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, अद्याप या यादीबाबत निर्णय का घेतला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने २१ मे रोजी केली होती.त्यातच माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही १२ जणांची यादी राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. मात्र, अशी यादी उपलब्ध नसल्याचे उत्तर सचिवालयाने दिले. त्याचा आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रात ‘१२ नावांची  यादी भुतांनी पळविली का’, असा खोचक प्रश्न करत त्याबाबतचे उत्तर आता राज्यपालांनीच द्यावे, असे म्हटले होते.या पार्श्वभूमीवर, राजभवनकडे विचारणा केली असता स्पष्ट करण्यात आले की, ही यादी राज्यपालांकडेच आहे. राज्याच्या तीन कॅबिनेट मंत्र्यांनी ती राजभवनवर येऊन राज्यपाल महोदयांकडे दिलेली होती, त्यामुळे ती उपलब्ध नसल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सुत्रांनी सांगितले की, माहिती अधिकारात ही यादी मागण्यात आली होती. ती देता येणे गोपनीयतेच्या कारणाने राजभवनला शक्य नव्हते. महाविकास आघाडी सरकारकडून यादी देण्यात आली, तेव्हाही १२ जणांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नव्हती. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील विशिष्ट पत्रव्यवहार उघड न करण्याचा या दोन्ही घटनात्मक संस्थांना कायदेशीर अधिकार आहे. अशावेळी ‘ही यादी आमच्याकडे उपलब्ध नाही’ असे उत्तर देण्याऐवजी राजभवनने ‘सदर पत्रव्यवहार उघड करता येणार नाही’, असे उत्तर कायद्याचा आधार घेत दिले असते तर अधिक सुयोग्य ठरले असते, असे कायद्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी