शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 23 जागा जिंकणारच, ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:43 IST

लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे, तस तशा राजकीय चढाओढ वाढत चालली आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे, तस तशा राजकीय चढाओढ वाढत चालल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाहसुद्धा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सरळ निशाणा साधला आहे. ममता सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, त्यामुळे पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट होत चालली आहे. ही निवडणूक पश्चिम बंगालची अस्तित्वाची निवडणूक आहे.पश्चिम बंगालमध्ये भाजपा लोकसभेच्या 23 जागा जिंकणारच, असा निर्धारही अमित शाह यांनी बोलून दाखवला आहे. पश्चिम पंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत, त्यातील 23 जागांवर विजय मिळवण्याचं भाजपाचं लक्ष्य असल्याचंही अमित शाह म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019ची निवडणूक लढवावी,' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर मोदी बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. जनतेच्या न्यायालयात त्यांना दंडित केले जाईल' असे ममता बॅनर्जी यांनी मोदींविषयी प्रश्न विचारल्यावर म्हटलं होते.'मला माहीत आहे की, त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच 42 जागांवरुन निवडणूक लढवावी' असं ही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 'बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन' असा टोलाही त्यांनी लगावला होता.

टॅग्स :Amit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwest bengalपश्चिम बंगाल